स्वरा भास्कर आणि रणवीर शौरीच्या आगामी ‘शेम’चे पोस्टर रिलीज

shame
महिलांवर दिवसेंदिवस वाढत जाणारे लैंगिक अत्याचार हा आपल्या देशात गंभीर विषय बनत चालला असून समाजात याच विषयाला हात घालत जागरुकता करण्याचा प्रयत्न सर्व पातळीवर होणे आवश्यक आहे. दिग्दर्शक अनुषा बोस हे हेच ध्येय बाळगत ‘शेम’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.


यात स्वरा भास्कार आणि रणवीर शौरी या हरहुन्नरी कलाकारांची मुख्य भूमिका असेल. या चित्रपटात सयानी गुप्ता, सायरस साहुकार, तारा शर्मा, सीमा पाहवा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. अनुषा बोस दिग्द्रशन करीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती शरत कतारिया करीत आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केले आहे.

Leave a Comment