भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून 170 प्राणघातक शस्त्रे जप्त

bjp
मुंबई – कल्याण गुन्हे शाखेने 170 प्राणघातक शस्त्रे डोंबिवलीतील भाजपचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव धनंजय कुलकर्णी (वय 49) असे असून आधारवाडी तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

तपस्या फॅशन हाऊस हे दुकान डोंबिवलीतील महावीरनगर भागात अरिहंत इमारतीच्या तळमजल्यावर आहे. भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या मालकीचे हे दुकान आहे. भाजपचा धनंजय कुलकर्णी हा डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे. शस्त्रसाठा त्याच्या दुकानात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी यानुसार छापा टाकून शस्त्रसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा सुमारे 2 लाख रुपयांचा आहे. यात पिस्तूलचाही समावेश आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment