मनु साहनी आयसीसीचे नवीन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर

manu-sawhany
नवी दिल्ली – मनु साहनी यांची चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नेमणूक केली आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर सध्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डेव्हिड रिचर्डसन यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर त्यांची जागा मनु डेव्हिड घेतील.


यापूर्वी मनु साहनी यांनी सिंगापूर स्पोर्ट्स हबचे सीइओपद भुषवले असून त्यांच्याकडे ईएसपीएन स्टार स्पोर्ट्ससोबत तब्बल १७ वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. तसेच मनु यांनी मँचेस्टर युनायटेड लिमिटेडसोबतही काम केले आहे. आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी सांगितले की, आयसीसीमध्ये मनु यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. १५ जानेवारीला आयसीसीचकडून मनु यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Leave a Comment