पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर

ranveer-singh
मोठ्या पडद्यावरील सर्वात हीट जोडींमधील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची एक जोडी आहे. दोघांनी नुकतेच लग्न केले आहे आणि लग्नानंतर त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी इच्छूक आहेत. असा कोणता चित्रपट 2019 मध्ये नाही ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर सिंह एकत्र दिसतील. पण लवकरच पडद्यावर दीपिका आणि रणबीर कपूर ही जुनी जोडी दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुन्हा एकदा दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर एका चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरु आहे. लव रंजनच्या येणाऱ्या नवीन चित्रपटात दीपिका आणि रणबीर काम करणार आहेत. लव रंजनच्या येणाऱ्या नवीन चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका तसेल लीड रोलमध्ये त्याचबरोबर अजय देवगण देखील या चित्रपटात दिसणार आहे. तसेच दीपिका या चित्रपटात फीमेल लीड रोलमध्ये आहे.

बॉलीवूडला रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. ‘बचना ऐ हसीनो’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’ सारख्या चित्रपटात या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली. अनेक दिवस ही जोडी कोणत्याच चित्रपटात एकत्र दिसली नाही. रणबीर आणि दीपिका पादुकोणच्या ब्रेकअपनंतर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा या दोघांना एकत्र पाहण्याची अपेक्षा सोडली होती. मात्र हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार असल्याच्या वृत्तामुळे सध्या रणबीर आणि दीपिकाचे चाहते जास्त उत्साहीत आहेत.

Leave a Comment