‘सिम्बा’ने जगभरात केली 350 कोटींपेक्षा जास्त कमाई

simmba
रणवीर सिंहच्या 2018 च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ चित्रपटामुळे नववर्षाची सुरुवातही बॉलिवूडसाठी गोड झाली. ‘सिम्बा’ने भारतातील बॉक्स ऑफिसवर 227 कोटींची कमाई केली आहे. ‘सिम्बा’ने शाहरुख-दीपिकाच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाला मागे टाकत नवा विक्रम रचला आहे. यासोबतच रणवीरच्या दोन चित्रपटांचा समावेश 2018 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत झाला आहे.

अवघ्या तीन आठवड्यांच्या आतच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ने देशात 227.21 कोटींच्या पार गल्ला जमवला. जगभरात ‘सिम्बा’ने 350 कोटींच्या पार कमाई केल्याची माहिती आहे. 80 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट जगभरात चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. सिम्बा बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालत असून हा आकडा वाढण्याची चिन्ह आहेत. सिम्बाने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हे चित्रपट असतानाही अठरा दिवसातच कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. पहिल्या पाच दिवसात सिम्बाने शंभर कोटींच्या, तर बारा दिवसांत दोनशे कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली होती.

रोहित शेट्टीचेच दिग्दर्शन असलेल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाच्या लाईफटाईम कलेक्शनलाही ‘सिम्बा’ने मागे टाकले आहे. यासंदर्भात माहिती चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने 227.13 कोटींची कमाई केली होती. लाईफटाईम डोमेस्टिक (भारतातील) कलेक्शनमध्ये सिम्बा सध्या नवव्या स्थानावर असून चेन्नई एक्स्प्रेसची दहाव्या क्रमांकावर पिछेहाट झाली आहे. या यादीत दंगल (387 कोटी) पहिल्या स्थानी असून त्यानंतर संजू, पीके, टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान, पद्मावत, सुलतान, धूम 3 या चित्रपटांचा क्रमांक लागतो.

Leave a Comment