
नवी दिल्ली : मार्केटमध्ये अनेक नवनवीन कपड्यांचा ट्रेड येतच असतो. आता अशी एक अजबगजब जीन्स मार्केटमध्ये आली आहे. या जीन्सची किंमत ऐकू तुम्ही थक्क व्हाल. या जीन्सची किंमत आहे चक्क 26 हजार रुपये. आता तुम्हाला असे वाटेल की या जीन्समध्ये नक्की आहे तरी काय?
‘या’ जीन्सची किंमत आहे चक्क 26 हजार रुपये
ही जीन्स युक्रेनच्या फॅशन डिझायनर कसेनिया शनाइडर (Ksenia Schnaider) च्या प्री-फॉल 2019 कलेक्शन मधील आहे. या जीन्सची सोशल मिडियावर जोरदार चर्चा होत आहे. या जीन्सच्या एका पायला स्ट्रेस आहे तर दूसरा पायाला वाइड फ्लेयर स्टाइल आहे. या जीन्सची स्टाइल सर्वात वाईट असल्याचे बोलले जात आहे. तर काही जण ही जीन्स विकत घेऊ इच्छित आहे. या जीन्सची किंमत 290 यूरो म्हणजेच 26,537 रुपये आहे.

अशी एक जीन्स 2018 मध्ये ही व्हायरल झाली होती. त्या जीन्सला केवळ खिसा आणि चैन होती. याशिवाय, पाय झाकण्यासाठी कोणतेही कापड नव्हते. ही जीन्स ऐवढी लोकप्रिय झाली होती की काही तासांत या जीन्सची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा अधिक झाली होती.
