पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी !

narendra-modi
देशातील जनतेशी संवाद साधण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच सोडत नाही. कधी चाय पे चर्चा तर कधी मन की बातच्या माध्यमातून ते देशातील जनतेशी संपर्क साधत असतात. आता पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, यासाठी पंतप्रधान मोदींनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू शकतात.

विद्यार्थ्यांचा परिक्षा काळातील ताण-तणाव कमी कसा करता येईल यावर मोदी आता विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. परीक्षेच्या तणावापासून मुक्त होण्यासाठी पंतप्रधान मोदी देशभरातील विद्यार्थ्यांना तणावमुक्त होण्याचे उपाय सांगणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहे. 29 जानेवारीला दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमनमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

विद्यापीठ आणि शाळांना या कार्यक्रमांचे निमंत्रण पत्र देखील पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सर्वांना सहभाग घेता येणार आहे.महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील.

पंतप्रधान मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला एका लहान स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागणार आहे. यात विचारल्या जाणा-या साध्या प्रश्नांची उत्तरे देऊन पंतप्रधान मोदींना भेटण्याची संधी मिळू शकते. नोंदणीसाठी 16 जानेवारी ही शेवटची तारीख आहे.

Leave a Comment