देशातील 63 टक्के लोकांची मांसाहारापेक्षा शाकाहाराला पसंती

Vegetarian
देशातील मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यादरम्यान एक चांगली बातमी आहे की लोक आता संतुलित आहार घेण्यास प्राधान्य देत आहे. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, 63 टक्के भारतीय मांसाहारऐवजी शाकाहारी अन्न पंसद करतात. म्हणजे मांसाहारी पेक्षा शाकाहारी लोकांची संख्या जास्त आहे. ग्लोबल रिसर्च कंपनी इस्पोसच्या रिपोर्ट ‘फूड हैबिट्स ऑफ इंडियन्स: इप्सॉस स्टडीज’मध्ये आढळून आले की, भारतीय आता माहितीच्या आधारावर आपल्या खान-पानाच्या सवयीत बदल करत आहेत.

सर्वेक्षणात म्हटले आहे की, “भारतीय खवय्ये प्रेमी आहेत. तंदूरी चिकन, मटन, मासे आणि विविध प्रकारचे मासांहारी जेवण करणे पसंद करतात. पण रायशुमारीमध्ये 63 टक्के भारतीयांचे म्हणणे आहे की, ते मांसाहार पेक्षा शाकाहारी अन्न जास्त पसंत करतात. ”

गेल्या वर्षी 24 ऑगस्टपासून 7 सप्टेंबरपर्यंत 29 देशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणात भारतातील 1,000 नमुने घेतले गेले होते. या अहवालात म्हटले आहे की, 57 टक्के लोकांनी सेंद्रिय अन्न पसंत करतात. तर विकसित देशांमध्ये जास्त करुन सेंद्रिय अन्न खाणाऱ्या लोकांची संख्या कमी आहेत. यात जपानी 13% आणि ब्रिटिश 12% आहेत.

Leave a Comment