अंबानी बाळे चालली राईडला, अलिशान गाड्यांच्या ताफा रक्षणाला

bacche-ambani
धनिक लोकांची मुले हे नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय असतो. आशियातील सर्वात श्रीमंत आणि देशातील बडे उद्योजक मुकेश अंबानी यांची मुलेही त्याला अपवाद नाहीत. मुकेश अंबानीकडचे लग्न असो व अन्य कार्यक्रम, त्याची चर्चा नेहमीच सोशल मिडीयावर होत असते. तेलापासून टेलिकॉम पर्यंत उद्योगाचे जाळे असलेल्या अंबानी कुटुंबातील आकाश आणि अनंत या दोन मुलांबद्दलही लोकांना मोठे आकर्षण आहे.

या मुलांचे आयुष्य कसे असेल याचे अनेक तर्क वर्तविले जात असताना एक जुना व्हिडीओ पुन्हा नव्याने सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात आकाश आणि अनंत बेन्टले बेन्टायगा या अलिशान कार मधून राईड घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मागे अलिशान गाड्यांचा काफिला जाताना दिसत आहे. त दोन बेन्टले कार्स, लँडरोव्हर डिस्कव्हरीच्या चार, ३ रेंजरोव्हर , एक रेंजरोव्हर स्पोर्ट्स, बीएमडब्ल्यू एक्स ५ आणि फोर्ड एन्डेव्हरच्या सहा गाड्या सामील आहेत. या सर्व कार मध्ये अंबानी बंधूंचे सुरक्षा रक्षक असून या सर्व कार्सची किंमत १६ कोटी ५५ लाखांपेक्षा अधिक आहे.

Leave a Comment