उडान ३ मध्ये कमी पैशात परदेश प्रवासाची संधी

udaan
कमी खर्चात आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याचे सर्वसामान्य माणसाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून केंद्र सरकारच्या उडान ३ योजनेमुळे हे शक्य होणार आहे. उडान याचा लाँग फॉर्म उडे देश का आम नागरिक योजना असा असून हि योजना केंद्राने २०१६ मध्ये लाँच केली होती.

या योजनेचा उद्देश सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किमतीत विमान प्रवास घडविणे हा आहे. या योजनेत सुरवातीला छोटी शहरे समाविष्ट केली गेली होती. त्यानुसार २५०० रुपयात या शहरात विमान प्रवास करणे शक्य झाले होते. आता त्यापुढची योजना हाती घेतली गेली असून त्यात आंतरराष्ट्रीय प्रवास सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी आत्तापर्यंत १०० पेक्षा अधिक प्रस्ताव आले आहेत. सर्वप्रथम आसाम मधून बँकॉक, थायलंड, काठमांडू साठी प्रस्ताव आले असून बिहार मधून नेपाल, बांगलादेश, म्यानमारसाठी प्रस्ताव आले आहेत.

उडान ३ साठी १५ विमानकंपन्यांनी १११ मार्गावर उड्डाणे करण्याचे प्रस्ताव दिले असून त्यात स्पाईसजेटचे ३७ तर इंडिगोचे २० प्रस्ताव आहेत असे समजते.अर्थात यासाठी तिकिटांवर ज्या सवलती द्यायच्या आहेत त्याचा खर्च संबंधित राज्याने उचलायचा आहे असेही समजते.

Leave a Comment