15 जानेवारीला का साजरा केला जातो भारतीय सेना दिवस ?

army2
देशात दरवर्षी 15 जानेवारी आर्मी दिन म्हणजेच सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले सेनाध्यक्ष के.एम.करियप्पा यांनी या दिवशी त्यांच्या पदाचा स्वीकार केला. करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 साली ब्रिटीशांच्या काळातील भारतीय सेनेतील अंतिम शीर्ष कमांडर जनरल रॉय फ्रांसिस बुचर हा पदाभार स्वीकारला होता. निवृत्त झाल्यानंतर तब्बल 33 वर्षांनी करियप्पा यांना ‘फिल्ड मार्शल’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले होते. या दिवशी सैन्यात परेडसह इतर अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच दिल्ली व सेनेच्या सर्व मुख्यालयात हे कार्यक्रम पार पडतात.
army1
28 जानेवारी 1899 साली कर्नाटकच्या कुर्गमध्ये शनिवर्सांथि येथे करियप्पा यांचा जन्म झाला. सेकंड लेफ्टिंनेंट पदापासून करियप्पा यांनी नोकरीला प्रारंभ केला. करियप्पा यांनी 1947 मध्ये भारत-पाक युद्धात भरीव कामगिरी केली. 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे सेनाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच दरवर्षी 15 जानेवारीला ‘आर्मी दिन ‘ साजरा केला जातो.
army
कोलकाता येथे 1776 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सरकारच्या अधीन राहून भारतीय सैन्याची स्थापना केली. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 सैन्य तळ आहेत. भारतीय सैन्यात सैनिक आपल्या इच्छेने सहभागी होतात.

Leave a Comment