फरहान अख्तरचा ‘द फकीर ऑफ वेनिस’ पुन्हा रखडला

farhan-akhtar
अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तर आणि अन्नू कपूरच्या आगामी चित्रपट ‘द फकीर ऑफ वेनिस’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून हा चित्रपट आता पुढील महिन्यात रिलीज होईल. ‘चीट इंडिया’ आणि ‘फ्रॉड सैयां’ चित्रपटांची १८ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. हा चित्रपट याच दिवशी रिलीज करणे परवडणारे नव्हते हा विचार करुनच रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे.

तब्बल १० वर्षापूर्वी ‘द फकीर ऑफ वेनिस’ हा चित्रपट बनला होता. अभिनेता म्हणून फरहान अख्तरचा हा पहिलाच चित्रपट ठरणार होता. परंतु रिलीजची तारीख काही ना काही कारणाने पुढे जात राहिली. चित्रपटाचे निर्माते पुनीत देसाई म्हणाले, द फकीर ऑफ वेनिस चित्रपटाला सर्व मल्टीप्लेक्समधून जोरदार प्रतिसाद मिळणार आहे. १८ जानेवारी आणि २५ जानेवारीला काही चित्रपट रिलीज होत आहेत. ते म्हणाले, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आणि ‘सिंबा’ चित्रपटाने बहुतेक स्क्रिन्स काबीज केल्यामुळे मल्टीप्लेक्स भागीदारांनी तारीख पुढे ढकलून १ फेब्रुवारी करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment