‘सारे जहां से अच्छा’मधून शाहरुखचा काढता पाय

shahrukh-khan
अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित आगामी ‘सारे जहां से अच्छा’ या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. सुरुवातीला या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिका साकारणार होता. पण नंतर शाहरुख खान यात भूमिका साकारणार असल्याचे त्याने सांगितले होते. पण शाहरुखनेही आता या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे.

अलिकडेच शाहरुखचा प्रदर्शित झालेला ‘झिरो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्याला या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली. तो या चित्रपटानंतर सारे जहां से अच्छा, या चित्रपटाचे काम हाती घेणार होता. पण याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, त्याने या चित्रपटातून आता बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘डॉन-३’ हे यामागचे कारण सांगितले जात आहे. शाहरुखने ‘झिरो’च्या अपयशामुळे डॉन चित्रपटाच्या तिसऱ्या भागात भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे.

Leave a Comment