लैंगिक शोषणाचा दिग्दर्शक राजकुमार हिराणींवर आरोप

rajkumar-hirani
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी #MeToo मोहिमेला उधाण आले होते. अनेक अभिनेते अन् दिग्दर्शकांवर या मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. हे वादळ काही दिवसांपासून शमलेले असतानाच आता लैंगिक शोषणाचा आरोप प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यावर केला गेला आहे.

हिराणींने मार्च ते सप्टेंबर २०१८ या काळात आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांत सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने केला आहे. या महिलेने या आरोपांचा मेल हिराणींसह विधू विनोद चोप्रा आणि शेली चोप्रा यांनाही पाठवला आहे. पण हे आरोप हिराणी यांनी फेटाळून लावले आहेत.

हिराणींनी एप्रिल महिन्यात माझे लैंगिक शोषण करण्यास सुरूवात केली. या गोष्टीला विरोध केल्यास चित्रपटात काम देणार नाही, अशी धमकी हिराणींने दिली असल्याचे महिलेने म्हटले. आपल्याला हे काम घालवायचे नसल्याने आपण त्यावेळी आवाज उठवला नाही असेही या महिलेने म्हटले आहे. माझ्याशी एका रात्री करण्यात आलेल्या गैरवर्तणुकीमुळे मी पूर्णपणे खचून गेले आणि हे पुढील सहा महिने असेच सुरु होते, असेही तिने म्हटले. पण हे सर्व आरोप हिराणींने फेटाळून लावले आहेत.

Leave a Comment