
नवी दिल्ली – आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स इन्स्टाग्राम घेऊन येत असते. इन्स्टाग्रामने यावेळी देखील आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर आणले आहे. युजर्स या फीचरच्या मदतीने एकाच वेळी मल्टिपल अकाऊंट्सवरून पोस्ट करू शकतात. यासंदर्भात टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार आता मल्टिपल अकाऊंट्सवरून इन्स्टाग्राम युजर्स एकच कंटेंट एकाच वेळी पोस्ट करू शकतो.
युजर्ससाठी इन्स्टाग्रामने आणले नवीन भन्नाट फीचर
याआधी इन्स्टाग्रामवर युजर्सना वेगवेगळ्या अकाऊंटवरून पोस्ट शेअर करायची असल्यास थर्ड पर्टी अॅपची मदत घ्यावी लागत होती किंवा मग एका एका अकाऊंटवर जाऊन पोस्ट शेअर करावी लागत असे. पण आता या नव्या फीचरमुळे मल्टिपल अकाऊंट एकाचवेळी मॅनेज करणे अधिक सोपे होणार आहे. युजर्सना पोस्ट करताना ‘Self-regram’ हा पर्याय मिळणार आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर मल्टिपल अकाऊंटवरून पोस्ट करता येते. हे फीचर सध्या फक्त आयओएससाठीच उपलब्ध आहे. हे फीचर अॅन्ड्रॉईडवर कधी येणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. याआधी इन्स्टाग्रामने अंध युजर्ससाठी फोटोचे डिस्क्रिप्शन ऐकण्याचे फीचर आणले होते.
