या सेलिब्रिटीजनी आत्मसात केली आहे व्हेगन आहारपद्धती

veg
सध्या जगभरामध्ये व्हेगन आहारपद्धती विशेष लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहे. या आहारपद्धतीमध्ये प्राण्यांपासून मिळविलेले सर्व खाद्यपदार्थ वर्ज असून, यामध्ये वनस्पतींपासून मिळविलेले अन्नपदार्थ सेवन करायचे असतात. ही आहार पद्धती आता जगभरामध्ये खूप लोकप्रिय झाली असल्याने दर वर्षी १ नोव्हेंबरचा दिवस ‘वर्ल्ड व्हेगन डे’ म्हणून साजरा केला जातो. या आहार पद्धतीचा अवलंब करणारी व्यक्ती जाणीवपूर्वक सर्व मांसाहार, तसेच प्राण्यांपासून मिळत असलेल्या सर्व अन्नपदार्थांचा त्याग करून संपूर्ण शाकाहाराचा अवलंब करीत असते. अनेक जणांनी भूतदयेपायीही प्राण्यांपासून मिळत असलेल्या अन्नपदार्थांवर पाणी सोडले आहे.
veg1
भारतातील अनेक सेलिब्रिटीजही व्हेगन आहारपद्धतीचे पुरस्कर्ते असून, उत्तम आरोग्यासाठी अनेकांनी या आहारपद्धतीचा स्विकार केला आहे. अभिनेत्री सोनम कपूर हिला गेली अनेक वर्षे मधुमेहाचा विकार असून, आरोग्यदायी आहार पद्धती म्हणून सोनमने व्हेगन आहारपद्धती स्वीकारली आहे. सोनम प्रमाणेच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिनेही व्हेगन आहारपद्धतीचा स्वीकार केला आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे सध्याचे सुपरफिट रूप हे व्हेगन आहार पद्धतीमुळे आणि नियमित व्यायामाचे परिणाम आहे.
veg2
बॉलीवूडची क्वीन कंगना रानौत आणि भारत क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली हे देखील व्हेगन आहारपद्धतीचे पुरस्कर्ते आहेत. तर बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान यानेही व्हेगन आहार पद्धतीचा स्वीकार केला असल्याचे समजते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment