1300 जागांसाठी अॅमेझॉनकडून नोकरभरती

amazon
एकीकडे केंद्र सरकार ई-कॉमर्स कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्याबाबत कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असतानाच भारताबाबत सकारात्मक पाऊल अॅमेझॉन कंपनीने उचलले आहे. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या तयारीत अॅमेझॉन कंपनी आहे. कंपनीकडून 1300 जागांसाठी लवकरच नोकरभरती सुरू होणार आहे.

अॅमेझॉनच्या संकेतस्थळानुसार, जेवढी नोकरभरती चीममध्ये करण्याच्या विचारात कंपनी आहे त्याच्या तिप्पट भरती भारतात होणार आहे. आशियाच्या बाहेर किंवा अमेरिकेच्या बाहेर केवळ जर्मनी एकमेव असा देश आहे जेथे अॅमेझॉन कंपनी भारताएवढी नोकरभरती सुरू करणार आहे. कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रात विविध प्रकारचे व्यवसाय आणि भूमिकांसाठी 1300 नोकरभरती करणार आहे. दुसरीकडे चीनमध्ये 467, जपानमध्ये 381, ऑस्ट्रेलियामध्ये 250, सिंगापूरमध्ये 174, दक्षिण कोरिया 70 आणि हाँगकाँगमध्ये 10 जागांसाठी नोकभरती होणार आहे.

अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळानुसार, पेमेंट्स, कंटेंट(प्राइम व्हिडीओ), व्हॉइस असिस्टंस(अॅलेक्सा), फूड रिटेल आणि कस्टमर सपोर्ट यांसारख्या क्षेत्रात नोकरभरती होईल. सर्वाधिक नोकरभरती बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसाठी असण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2018 च्या अखेरपर्यंत कंपनीने 60 हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध करुन दिल्याचं एक अहवाल सांगतो.

Leave a Comment