काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवणार – गुलाम नबी आझाद

ghulam-nabi-azad
लखनौ – सपा आणि बसप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला दोन हात दूर ठेवत एका मंचावर आले आहेत. काँग्रेसचे गणित यामुळे पुरते बिघडले आहे. यावर बोलताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही उत्तर प्रदेशात सर्वच्या सर्व ८० जागांवर लढू आणि २००९ च्या तुलनेत दुप्पट जागा जिंकू, असा दावा केला आहे.

पुढे आझाद म्हणाले, आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात सर्वच्या सर्व ८० जागांवर लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. काँग्रेस २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात सर्वोत मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. आम्ही या निवडणुकीत स्वबळावर लढू आणि तेव्हाच्या तुलनेत दुप्पट जागा जिंकू.

ही आघाडी आम्ही तोडली नाही, जनतेला हे माहित आहे. यापूर्वीच आम्ही म्हटले आहे, भाजपला विरोध करण्याऱ्या कोणत्याही पक्षासोबत जाण्यास आम्ही तयार आहोत, पण कुणावरही आम्ही बळजबरी करणार नाही. आता सपा-बसपा प्रकरण बंद झाले आहे. आम्ही आता स्वबळावरच भाजपसोबत लढू, असेही आझाद म्हणाले.

Leave a Comment