एका महिलेने इंडिया गेटवर दिल्या देशविरोधी घोषणा

india-gate
नवी दिल्ली – सातत्याने राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेच्या मोठ्या-मोठ्या दाव्यांची पोल खोल होताना दिसत आहे. दिल्लीत सकाळच्या सुमारास इंडिया गेटवर मानसिक दृष्या दुर्बल असलेल्या एका महिलेने देशविरोधी घोषणा दिल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर संबंधित महिलेने चप्पल काढून इंडिया गेटवर आक्षेपार्ह वक्तव्येही केले.

सुल्ताना खान (३८) असे संबंधित महिलेचे नाव असून इंडिया गेटवर या महिलेने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. घटनेची माहिती मिळताच महिला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. ही महिला मानसिकदृष्या सक्षम नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. रुग्णालयात महिलेला पाठविण्यात आले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी नवी दिल्ली जिल्हा पोलीस उपायुक्त मधुर वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला इंडिया गेटजवळ गोंधळ घालत देशविरोधी घोषणा देत होती. यानंतर महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविले.

Leave a Comment