मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंकडून अमितच्या लग्नाचे निमंत्रण

raj-thakre
मुंबई – आज ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेत चिरंजीव अमितच्या लग्नाच्या निमंत्रण दिले. १० मिनिट राज आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. २७ जानेवारीला अमित यांचे लग्न पार पडणार असून या लग्नाचे निमंत्रणासाठी राज अनेक मान्यवरांची भेटी घेत आहेत.

बऱ्याच नेते मंडळींना या लग्नाचे निमंत्रण देण्यात येत आहे. राज यांनी यासाठी दिल्लीची ‘वारी’ही केली. तसेच राज यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांना लग्नाचे निमंत्रण दिले. या लग्नाच्या निमंत्रणासाठी राज यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

चिरंजीव अमित यांचे लग्न मितालीशी होणार आहे. मिताली ही प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे. रविवार, २७ जानेवारीला दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या ‘सेंट रेजिस’मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

Leave a Comment