पुण्यातील मेजर शशी नायर यांना दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात वीरमरण

army
पुणे – शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी येथे नियंत्रण रेषेजवळ पेरुन ठेवलेल्या २ आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस) बॉम्बचा स्फोट झाला. पुणे येथील मेजर शशीधरन नायर आणि एका जवानाला या स्फोटात वीरमरण आले.

दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठीच घडवला होता. मेजर शशीधरन पुण्यातील रहिवासी होते. पुण्यातील खडकवासला येथे त्यांची पत्नी तृप्ती नायर या राहतात. मेजर शशीधरन ३३ वर्षांचे होते. ११ वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते. त्यांचे पार्थिव सकाळी ११ वाजता विमानाने पुण्यात येणार असल्याचे सैन्यातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, राजौरी जिल्ह्य़ातील सुंदरबनी भागात नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एका भारवाहकालाही (पोर्टर) वीरमरण आले.

Leave a Comment