‘ठाकरे’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज

thakre
संपूर्ण जगभरात येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ठाकरे या उत्कंठावर्धक आगामी चित्रपटाचे म्युझिक आज लॉन्च करण्यात आले आहे. आजही कानावर आवाज कुणाचा बाळासाहेब ठाकरे यांची गर्जना पडताच ह्रदयाचा ठोका चुकतो. करोडो लोकांच्या मनावर आपल्या आवाज आणि विशिष्ट शैली यामुळे राज्य करून त्यांचे मानबिंदू ठरणाऱ्या हिंदुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे चित्रपटात बाळासाहेबांना समर्पित केलेली गाणी सज्ज झाली आहेत.

बाळासाहेब ठाकरेंवरील ‘आला रे आला’ हे पद्मश्री सुनील जोगी लिखित व नकाश अझीझ यांच्या आवाजातील गाणे म्हणजे बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणेच जल्लोषपूर्ण आणि उत्साहवर्धक असेल यात काहीच शंका नाही. तर “साहेब आपले”हे मनोज यादव यांच्या लेखणीतून उतरलेले आणि सुखविंदर सिंग यांच्या मधुर स्वरांनी सजलेले गाणे काळजाला भिडणारे गाणे आहे. ही गाणी मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीवर आपल्या संगीत दिग्दर्शन आणि राज्य गाजवणारी रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेली आहेत.

दोन्ही गाण्यातील शब्द इतके प्रखर आणि अर्थपूर्ण आहेत की त्यामुळे एका क्षणी गाणं ऐकून मंत्रमुग्ध व्हावंसे वाटते, ही गाणी भावनात्मक आहेत. शिवसैनिकांना गाणी ऐकल्यावर नक्कीच ऊर्जा मिळेल आणि कोणीही गाण्याचा चालीवर ताल धरल्या शिवाय राहणार नाही.

Leave a Comment