चंडीगडमध्ये या ठिकाणी भटकत आहे भूत !

ghost
प्रत्येक गावाशी निगडित काही ना काही अजब, विचित्र कथा असतातच. एखादी झपाटलेली वास्तू किंवा एखाद्या निर्जन रस्त्यावरून जाताना आलेले विचित्र अनुभव सांगणाऱ्या अनेक कथा जवळजवळ प्रत्येक गावाच्या बाबतीत ऐकिवात येत असतात. या कथा सत्य आहेत किंवा नाहीत याची पडताळणी करणे जरा मुश्कीलच असते. बहुतेकवेळी या कथा सांगोवांगी सर्वत्र पसरलेल्या असतात. तसेच ही कथा रंगवून सांगताना प्रत्येक जण अपापल्या परीने त्यामध्ये भरही घालीत असतो. त्यामुळे या कथा सत्य किंवा असत्य आहेत किंवा नाही हे जाणून घेणे कठीण असले, तरी या कथा रोचक असतात इतके मात्र नक्की. चंडीगड शहराच्या बाबतीतही अश्याच काही कथा प्रसिद्ध आहेत.
ghost1
चंडीगड शहरातील सेक्टर सोळा मध्ये असलेले एक घर झपाटलेले असल्याचे म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी या वास्तूमध्ये एका तरुणीने आत्महत्या केली होती, तेव्हापासून या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास असल्याचे बोलले जाते. चंडीगड येथे असलेल्या सावित्रीभाई फुले इस्पितळामध्ये वैद्यक शास्त्राच्या अनेक विद्यार्थ्यांना विचित्र अनुभव आले असल्याचे म्हटले जाते. या ठिकाणी असलेल्या विद्यार्थायांच्या वसतिगृहाच्या खिडक्यांमधून देखील अनेकदा चित्रविचित्र आकृती पाहिल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
ghost2
चंडीगडमधील रेल्वे विभागाचे अतिथीगृहातील एक कक्ष देखील झपाटलेला असल्याचे म्हटले जाते. त्याचप्रमाणे सेक्टर सोळा मधील जनरल हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या पुलावर ही एका तरुणीची आकृती पाहिल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ही तरुणी अएक वर्षांपूर्वी या इस्पितळामध्ये डॉक्टरमधून कार्यरत असून, एके दिवशी याच पुलावर एका अपघातामध्ये या तरुणीचे निधन झाले होते. तेव्हापासून अनेकांना ही तरुणी याच पुलावर दिसली असल्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment