हे आहेत टॉप 4 सर्वांत महाग सेलिब्रिटी

expensive
दिवसेंदिवस अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा आलेख उंचावत असून विराट कोहली २०१८ या वर्षातील सर्वांत महागडा भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे. त्याचपाठोपाठ बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात दीपिका पादुकोण आहे.

विराट कोहली सलग दुसऱ्यांदा ‘डफ अँड फेल्प्स’द्वारा जाहीर करण्यात आलेल्या भारतातील सर्वांत महागड्या सेलिब्रिटींच्या यादीत अव्वलस्थानी आहे. १७०.९ मिलिनय डॉलर विराटचे ब्रँड मूल्य तर १०२.५ मिलिनय डॉलर इतके दीपिकाचे ब्रँड मूल्य आहे. विशेष म्हणजे १०० मिलियन डॉलर ब्रँड मूल्याचा आकडा विराटशिवाय पार करणारी दीपिका एकमेव सेलिब्रिटी ठरली आहे.

विराटने गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत भारतातील २४ विविध ब्रँड्सच्या जाहिराती केल्या तर २१ विविध ब्रँड्सच्या जाहिराती दीपिकाने केल्या. बॉलिवूड सेलिब्रिटींना भारतात जाहिरातींसाठी अधिक महत्त्व दिले जाते. पण याला अपवाद विराट ठरला आहे. विराटने सर्व बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकत प्रसिद्धीच्या बाबतीत अव्वल ठरला आहे.

या यादीत विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. तर दीपिकाचा पती रणवीर सिंग चौथ्या स्थानी आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, वरुण धवन आणि हृतिक रोशन यांचा टॉप १०मध्ये समावेश आहे.

Leave a Comment