‘हॉटस्टार’ने डिलीट केला हार्दिक-राहुलचा तो एपिसोड

coffee
‘हॉटस्टार’वरून ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच प्रसारित झालेला एपिसोड डिलीट करण्यात आला आहे. शोमध्ये हार्दिक आणि लोकेश राहुल या दोघांनी महिलांविषयी काही आक्षेपार्ह वक्तव्य केली. दोघांवर त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड टीका झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर ‘हॉटस्टार’वरून ‘कॉफी विथ करण शो’चा तो एपिसोड काढून टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर या शोचे सर्व टीझर आणि फोटो ‘स्टार वर्ल्ड’ या वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून काढून टाकले आहेत.

हार्दिकने सोशल मीडियावर टिकेचा होणारा भडीमार पाहता आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर माफी मागितली होती. सर्वांची माफी मागत, महिला वर्गाचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते. बीसीसीआयला या दोघांनी केलेली वक्तव्य चांगलीच खटकली. बीसीसीआयची प्रतिमा अशा वक्तव्यामुळे मलीन होते. त्यामुळे या शो दरम्यान केलेल्या वक्तव्याबाबत या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या दोघांनी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल या दोघांवर २ एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घालण्यात यावी असे मत बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे CoA अध्यक्ष विनोद राय यांनी केले आहे, तर या समितीतील महिला सदस्या डायना एडलजी यांनी मात्र हे प्रकरण बीसीसीआयच्या कायदे समितीकडे वर्ग करण्याचे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment