श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धासाठी कुरुक्षेत्राची निवड का केली ?

mahabhart
महाभारतात असे कित्येक रहस्य आहेत की, त्याबद्दल खुपच कमी लोकांना माहिती आहे. यापैकी एक रहस्य आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. महाभारतात श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रमध्ये अर्जुनला गीतेचे ज्ञान दिले. कुरुक्षेत्रमध्येच महाभारताचे युद्ध घडले होते. परंतु कुरुक्षेत्रची महाभारताच्या युद्धासाठी निवड का करण्यात आली? यामागे एक मोठे रहस्य आहे.
mahabhart1
कौरव आणि पांडवांमध्ये महाभारताचे युद्ध झाले हे काही आपल्याला नव्याने सांगयाची गरज नाही. यात करोडो सैनिक मारले गेले होते. हे युद्ध सर्वात भीषण होते. असे युद्ध भूतो ना भविष्य असे झाले.
mahabhart2
भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रची जागा महाभारताच्या युद्धासाठी निवडली होती. पंरतु कुरुक्षेत्राचीच निवड महाभारताच्या युद्धासाठी का केली? यामागे एक गूढ रहस्य आहे. शास्त्रांच्या मते, जेव्हा महाभारत युद्ध करण्याचे ठरले तेव्हा युद्धासाठी जागेची शोध करण्यास सुरुवात झाली. या युद्धाद्वारे भगवान श्रीकृष्ण यांना जगात वाढलेले पाप नष्ट करुन धर्माची स्थापना करायची होती.
mahabhart3
असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्णला भिती होती की, गुरु-शिष्य, भाऊ-भावंडे आणि नातेवाईक याच्यातील युद्धामध्ये एकामेकांना मरताना बघून कौरव आणि पांडव एकत्र येतील. त्यामुळेच त्यांनी युद्धासाठी अशी जागा निवडली की, ज्या जागेत राग आणि द्वेष असेल. श्रीकृष्णाने यासाठी आपल्या सेवकांना पाठवले आणि त्या जागेचा शोध घेण्यास सांगितले.
mahabhart4
अनेक जागांचे निरीक्षण सर्व सेवकांनी केले आणि त्याची माहिती भगवान श्रीकृष्ण यांना दिली. त्यामध्ये एका सेवकाने कुरुक्षेत्र बद्दल एका घटनेची माहिती दिली. कुरुक्षेत्रमध्ये एकदा एका मोठ्या भावाने छोट्या भावाला शेतीचा बांध पावसाचा पाण्याने तोटल्याने ते पाणी आडवण्यास सांगितले. पण छोट्या भावाने त्याला नकार दिला. यावर मोठ्या भावाचा राग अनावर होऊन त्याने आपल्या लहान भावाची हत्या केली आणि ज्या ठिकाणी पाणी वाहत होते. त्या ठिकाणी त्याचे मृत शरीर पुरुन पाणी आडवले.
mahabhart5
सेवकांने सांगितलेली या सत्य घटना ऐकून श्रीकृष्ण यांनी ठरवले की, युद्धासाठी ही जागा योग्य आहे. श्रीकृष्णाला माहिती होते की, या जागेतील संस्कार भावंडांमधील युद्धामध्ये एकमेकांच्या बद्दल प्रेम निर्माण होणार नाही. त्यानंतर कुरुक्षेत्रमध्ये महाभारताचे युद्ध होणार असल्याची घोषणा श्रीकृष्णाने केली.

Leave a Comment