घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून कमवा हजारो रुपये

online
अनेकजण भरपूर पैसे कमावण्यासाठी बऱ्याच युक्त्या लढवत असतात. मग काहीजण वेगवेगळ्या स्किममध्ये पैसे गुंतवणे असो किंवा घरदार सोडून दूर जाऊनही पैसे कमावले जातात. पण तुमच्याकडे जर स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असेल तर घरबसल्याही तुम्ही हजारो, लाखोंची कमाई करु शकता. तुम्हाला यासाठी इंटरनेटचीही गरज लागणार नाही. तुम्हाला यासाठी Captcha भरावा लागेल आणि तुमच्या कमाईला सुरूवात होईल. वेळेचे यामध्ये कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही टायपिंग करुन पैसे कमाऊ शकता. तुम्ही तुमच्या टायपिंग स्पीडनुसार पैसे कमाऊ शकता.

Captcha एक कॉम्प्यूटर प्रोग्राम किंवा सिस्टिमचा असा प्रोग्राम आहे ज्याला सर्वसाधारण माणूस आणि मशीन इनपुट यांच्यातील फरक कळतो. याचे स्पॅमपासून वाचवणे हे मुख्य कार्य आहे. आपण अनेक साईटसवर आपले अकाऊंट बनवतो किंवा लॉग इन करतो तेव्हा खाली एक ईमेज दिसते. त्यामध्ये काहीतरी कोड असतो जो दिलेल्या बॉक्समध्ये भरायचा असतो त्यानंतरच ते लॉग इन पूर्ण होते. खूप सारे Captcha तुम्हाला दिले जातील आणि ते सोडवण्यासाठी 15 सेकंदाचा वेळही दिला जाईल. हे सोडवल्यावर तुम्हाला पैसे मिळतील.

गुगलवर अशा अनेक साईट्स तुम्हाला मिळतील जिथे हे काम केले जाते. तुम्हाला यासाठी स्वत:चे अकाऊंट बनवावे लागेल. यानंतर मिळालेल्या युझर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. सर्व वेबसाईट्समध्ये तुम्हाला Captcha सोडवण्याची पद्धत सांगितली जाईल. यातून योग्य पद्धत शिकून घ्यावी लागले. कारण चुकीच्या पद्धतीने Captcha भरल्यास पैसे कापून घेतले जातात.

कोणताही Captcha जर समजत नसेल तर स्टॉप वर क्लिक करुन तुम्ही पुन्हा स्टार्ट करु शकता. याव्यतिरिक्त सर्व वेबसाईटवर तुमच्या मित्रांना इन्वाईट करुन Captcha तून पैसे कमाऊ शकता. तुम्हाला कमावलेली रक्कम मिळवण्यासाठी Paypal आणि Payza वर अकाऊंट बनवावे लागेल. कारण जास्तीत जास्त वेबसाईट या माध्यमातूनच पेमेंट करत असतात. MegaTypers, CaptchaTypers, ProTypers,Captcha2Cash, 2Captcha,Qlinkgroup, VirtualBee अशा अनेक वेबसाईट्सवर लॉग इन करुन तुम्ही हजारोंची कमाई करु शकता.

Leave a Comment