जागतिक क्रमवारीत मेरी कोम अव्वल

mary-kom
नवी दिल्ली – भारतीय बॉक्सर मेरी कोम हिने नवी दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात विजेतेपद मिळवले होते. तिने या विजेतेपदाबरोबर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम केल्यानंतर भारतीयांना अभिमान वाटावी अशी आणखी एक कामगिरी सुपरमॉम मेरी कोम हिने केली आहे. जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत (AIBA) मेरी कोम हिला अव्वल स्थान मिळवले आहे.

मेरी कोम हिने हा सन्मान सलग चांगली कामगिरी केल्यामुळे मिळवला आहे. २०१८ हे साल मेरीसाठी खूपच फलदायी ठरले. तिने राष्ट्रकुल स्पर्धा आणि पोलंडमधील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा अशा दोनही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग क्रमवारीत तिच्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर तिने ७०० गुणांसह वजनी गटातील अव्वल स्थान पटकावले आहे. दरम्यान मेरी कोम हिला २०२० च्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी ५१ किलो वजनी गटातून खेळावे लागणार आहे. कारण ४८ किलो वजनी गट अद्याप २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही.

Leave a Comment