करणची ‘कॉफी’ भोवली, हार्दिक, लोकेशवर २ सामन्यांची बंदी?

trio
टीम इंडियाचा संघ कंगारुांना त्यांच्यात भूमीत पराभूत केल्याने वाहवा मिळवत आहे. पण याच कसोटी संघात असलेले हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी लागण्याची शक्यता आहे. या दोघांनी ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये मुलाखत दिली होती. त्यांनी काही आक्षेपार्ह विधाने त्यात केल्याचे दिसून आले. बीसीसीआयने या दोघांना यावरून कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे CoA अध्यक्ष विनोद राय यांनी या दोघांनी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल या दोघांवर २ एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घालण्यात यावी असे मत व्यक्त केले आहे, तर हे प्रकरण बीसीसीआयच्या कायदे समितीकडे वर्ग करण्याचे मत या समितीतील महिला सदस्या डायना एडलजी यांनी व्यक्त केले आहे.

मला हार्दिकने दिलेले स्पष्टीकरण न पटल्यामुळे या गोष्टीसाठी त्या दोन्ही खेळाडूंना मी दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी असे मत मांडले आहे. पण याबाबत अंतिम निर्णय हा डायना एडलजी यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे विनोद राय यांनी सांगितले. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या दोघांनी महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली. या दोघांवर त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड टीका होत आहे. या दोघांनी केलेली विधाने बीसीसीआयला चांगलीच खटकली. बीसीसीआयची प्रतिमा अशा वक्तव्यांमुळे मलीन होत असल्यामुळे या दोघांना या शो दरम्यान केलेल्या वक्तव्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.