आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ

geeta-gopinath
मुंबई : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रे भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी स्वीकारली असून आयएमएफ (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड) च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रमुखपद देण्यात आले आहे आणि हा सन्मान भारतीय महिलेला मिळणे अभिमानास्पद आहे.

गीता गोपीनाथ यांची गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या पदावर निवड झाली होती. मॉरिस ऑब्सफेल्ड 31 डिसेंबर रोजी मुख्य अर्थतज्ज्ञाच्या पदावरुन निवृत्त झाले. त्यानंतर गीता यांना पदभार स्वीकारला. म्हैसूरमध्ये गीता गोपीनाथ यांचा जन्म झाला होता. त्या हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक होत्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत गीता गोपीनाथ कार्यरत आहेत. एक ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांची नियुक्‍ती जाहीर करताना गीता गोपीनाथ या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या अर्थतज्ज्ञ असल्याचे म्हटले होते. याआधी रघुराम राजन यांनीही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद भूषवले आहे. त्यांच्यानंतर हा मान मिळणार्‍या त्या दुसर्‍या भारतीय ठरल्या आहेत.