सुशांतकडे तब्बल 12 चित्रपटांच्या ऑफर

sushant-singh
‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’. ‘काय पो चे’, ‘केदारनाथ’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारणारा सुशांत सिंग राजपूतने बॉलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवण्यास सुरुवात केली आहे. ‘केदारनाथ’च्या यशानंतर त्याच्याकडे चित्रपटांची रांग लागली असल्याचा खुलासा त्यानेच एका माध्यमाशी बोलताना केला आहे.

तब्बल १२ चित्रपटांची ऑफर्स सुशांतला मिळाल्याचे एका माध्यमाला त्याने सांगितले आहे. मला या चित्रपटांपैकी कोणता चित्रपट निवडावा हे कळत नाही. यातला एकही चित्रपट मला सोडावासा वाटत नाही. यातील किती चित्रपट तयार होतील आणि किती चित्रपटांमध्ये मला काम करता येईल यासंबधी विचार सुरू असल्याचे त्याने सांगितले आहे.

अलिकडेच सुशांतच्या आगामी ‘सोन चिडीयां’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्याचबरोबर त्याची ‘किझी और मॅनी’ या चित्रपटातही वर्णी लागली आहे. तो या चित्रपटांव्यतिरीक्त छिछोरे, आणि ‘चंदा मामा दूर के’ हे चित्रपटही साकारणार आहे. आता त्याच्या ‘सोन-चिडीयां’ चित्रपटानंतर तो त्याच्या आगामी चित्रपटांच्या तयारीला करणार आहे.

Leave a Comment