सलमान खान कॉपी करुन परीक्षा व्हायचा पास

salman-khan
आज अनेक कलाकारांचा बॉलिवूडचा ‘भाईजान’ अशी ओळख असलेला सलमान खान ‘गॉड फादर’ बनला आहे. बॉलिवूडवर त्याचा दबदबा अजूनही पाहायला मिळतो. त्याला म्हणूनच ‘दबंग स्टार’ म्हणूनही ओळखले जाते. पण लहानपणी हाच सलमान खान खूप खोडकर होता. त्याचे वडील सलीम खान यांनी त्याच्या लहाणपणीचा एक किस्सा कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला.

कपिल शर्माच्या शो मध्ये अलिकडेच सलीम खान हे सलमान खान आणि सोहेल खान यांच्याबरोबर आले होते. त्यांनी यावेळी सलमानच्या बालपणाची एक खोड उलगडली. त्यांनी सांगितले, की सलमानच्या खोडकरपणामुळे त्याला सतत वर्गाबाहेर काढून टाकण्यात येत असे. त्याने शाळेच्या परीक्षेदरम्यानही पेपर लीक केले होते. आमच्या घरी एक गणेश नावाचा व्यक्ती नेहमी येत असे. तो घरी आला की सलमान त्याची खूप खातिरदारी करत असे. ही गोष्ट लक्षात आल्यावर आम्ही त्या व्यक्तीची माहिती काढली. तो व्यक्ती सलमानचाच शिक्षक होता. सलमानला तो परिक्षेपूर्वीच पेपर घरी आणून देत असे. कपिलच्या शोमध्ये सलमानच्या अनेक खोड्यांचा खुलासा त्याच्या वडिलांनी केला.

Leave a Comment