ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी ‘या’ दिग्गज फुटबॉलपटूला अटक

wyne-roonie
लंडन – दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपाखाली इंग्लंड आणि मॅनचेस्टर युनायटेडचा माजी खेळाडू वेन रुनीला अटक करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्याला यासाठी २५ डॉलर्सचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

व्हर्जिनिया येथील लोडाउन कौंटी येथे १६ डिसेंबरला रुनीने नशेच्या अवस्थेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, दंड भरल्यानंतर रुनीला सोडून देण्यात आले. रुनी सध्या खेळत असलेल्या डीसी युनाटेडने सांगितले की, रुनीला अटक झाल्याची बातमी आम्हाला मिळाली आहे. आम्ही असे मानतो की, हा रुनीचा वैयक्तीक प्रश्न असून डीसी युनायटेड याला वैयक्तीक स्तरावर सोडवण्याचा प्रयत्नात असेल. रुनीला याआधीही २००७ साली इंग्लंड येथे नशेत गाडी चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यासाठी त्याला २ वर्ष वाहन न चालवण्याची शिक्षा करण्यात आली होती.

Leave a Comment