‘सॅटेलाईट शंकर’मध्ये झळकणार सुरज पांचोली

suraj-pancholi
‘हिरो’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सुरज पांचोली तब्बल ३ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘सॅटेलाईट शंकर’ असे आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून सुरजने त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.


बॉक्स ऑफिसवर आदित्य पांचोलीचा मुलगा असलेला सुरज पांचोलीचा पहिलाच चित्रपट दणकून आपटला. त्याच्यासोबत या चित्रपटात सुनिल शेट्टीची मुलगी अथिया हिनेही बॉलिवूड पदार्पण केले होते. पण, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळू शकले नाही. आता सुरज ३ वर्षानंतर ‘सॅटेलाईट शंकर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


या चित्रपटाचे ३ पोस्टर सुरजने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये शंकराची प्रतिमा दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इरफान कमाल हे करणार आहेत. चित्रपटाची कथा आणि इतर स्टारकास्टची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सुरज त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल फार उत्साहीत असल्याचे त्याच्या पोस्टवरून दिसून येते.

Leave a Comment