करमुक्त करा ‘ठाकरे’ चित्रपट, भाजप चित्रपट आघाडीची मागणी

vinod-tawde
भाजपच्या चित्रपट आघाडीने राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असणारा ‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या चित्रपट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र या खात्याचे मंत्री असलेल्या विनोद तावडे यांना दिले आहे. त्यानंतर ‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन तावडेंनी दिले आहे.

राजकीय हेतूने प्रेरित ‘ठाकरे’ चित्रपट करमुक्त करण्यात यावा ही मागणी असल्याचे मानण्यात येत आहे. कारण, शिवसेना-भाजपत युती होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही पक्षांकडून युतीवरुन एकमेकांविरोधात दंड थोपटले जात आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर शिवसेनेला गोंजारण्यासाठीच भाजपचे मंत्री तावडे यांच्याकडे ही मागणी केल्याची चर्चा आहे. कारण, ठाकरे चित्रपटाचे शिवसेना नेते संजय राऊत हे निर्माते आहेत. कायमच भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या राऊतांना गळ घालण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.

‘ठाकरे’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची प्रमुख भुमिका साकारली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव हीने यात माँसाहेब अर्थात बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भुमिका साकारली आहे. त्याचबरोबर सचिन खेडेकर यांनी यातील बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तीरेखेला आवाज दिला आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment