आता जिओच्या फोनमध्ये अॅड झाले हॉटस्पॉट फिचर

jio
नवी दिल्ली : अनेकवेळा मोबाईलमधील इंटरनेट डेटा संपल्यावर नाईलाज होतो. दुसऱ्याकडून अशावेळी हॉटस्पॉट घेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. हेच हॉटस्पॉट फिचर आता जिओच्या फिचरफोनमध्ये नव्याने देण्यात येणार आहे. जिओफोन आल्यापासून ते आतापर्यंत या फोनमध्ये नवनवीन फिचर्स जोडण्यात येत आहेत. तुम्हाला या सुविधेमुळे दुसऱ्या युजर्सला हॉटस्पाट देता येणार आहे. जुलै २०१७ मध्ये हा जिओफोन लाँच करण्यात आला होता. हा जिओफोन खरेदी करताना दिलेली रक्कम तीन वर्षांनी परत मिळणार असल्याने हा जिओफोन घेण्यासाठी अनेकांनी पसंती दर्शवली होती.

आपल्या जिओफोनमध्ये हॉटस्पॉटचे नवे फिचर्स डाउनलोड करण्यासाठी युजरला सॉफ्टवेअर अपडेट करावे लागणार आहे. सॉफ्टवेअरच्या अपडेटच्या माध्यमातून कंपनीने हे नवे फिचर्स दिले आहे. म्हणजेच जिओफोनमध्ये युजरला एक सॉफ्टवेअर अपडेट करण्यासंदर्भातील सूचना मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपोआप हॉटस्पॉटचे फिचर तुमच्या जिओफोनमध्ये डाउनलोड होईल. युजरला हे नवे फिचर जर आपल्या जिओफोनमध्ये डाऊनलोड करण्यास त्रास होत असेल, तर एकदा त्याने सॉफ्टवेअर अपडेट करण्यासंदर्भातील कोणती विनंती आहे का, हे तपासून पाहावे. अशा प्रकारची विनंती जर असल्यास , युजरला ते सॉफ्टवेअर अपडेट करुन घ्यावे लागेल. हॉटस्पॉटचे नवे फिचर युजरला यानंतरच जिओफोनमध्ये दिसेल.

हॉटस्पॉट जिओफोनमध्ये सुरु करण्यासाठी आधी setting अॅप ओपन करावे लागेल. यानंतर network आणि conectivity या पर्यायांमध्ये internet sharing पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला wifi hotspot पर्याय मिळेल. hotspot सुरु केल्यानंतर याचा फायदा घेता येणार आहे. यासोबत तुम्ही कॉम्प्युटर आणि लॅपटॉप देखील जोडू शकता. तसेच युजर आपल्या सोयीनुसार त्याच्या हॉटस्पॉटचे नावदेखील बदलू शकणार आहे.

Leave a Comment