1 फेब्रुवारीला सादर होणार मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प

budget
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 जानेवारीपासून सुरु होणार असून 13 फेब्रुवारीला संपणार आहे. 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली सादर करणार असल्याची माहिती मिळते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीच्या बैठकीत (CCPA) ठरविण्यात आली आहे. लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे, कारण एप्रिल किंवा मे महिन्यात आगामी लोकसभा निवडणुका असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

हा अंतरिम अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी महत्वाचा आहे. कारण, सरकार आपला अंतरिम अर्थसंकल्प आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करणार आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीय वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली जाऊ शकते. तसेच, नोकरदारांच्या कर बचत मर्यादेत वाढ आणि आयकराची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचबरोबर, गृहकर्जावरही सूट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.