प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहेत मुन्ना-सर्कीट

munnabhai
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर आता त्याचा तिसरा भाग येणार आहे. यासंदर्भातील माहिती अभिनेता अर्शद वारसीने दिली आहे. ‘मुन्नाभाई ३’च्या शूटिंगला या वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा अखेरपर्यंत सुरुवात होणार असल्याचे त्याने सांगितले.

२००३ मध्ये राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा सिक्वल त्याच्या तीन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. जवळपास १० वर्षांहून अधिकचा काळ ‘मुन्नाभाई ३’साठी लागला. पहिल्या दोन चित्रपटांप्रमाणेच संजय दत्त मुन्नाभाई तर अर्शद सर्कीटच्या भूमिकेत असेल.

चित्रपट झाल्यानंतर त्या भूमिकेला मी विसरून जातो. त्यामुळे ‘लगे रहो मुन्नाभाई’तील सर्कीटसाठीही मला फार वेळ लागला. पुन्हा पुन्हा पहिल्या चित्रपटातील दृश्ये बघून मी ती भूमिका साकारली होती. आता त्याहून जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरू असल्यामुळे जून किंवा वर्षाअखेरीस शूटिंगला सुरुवात होईल, असे अर्शदने सांगितल्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना मुन्नाभाई आणि सर्कीटची धमाल पाहायला मिळणार हे नक्की.

Leave a Comment