‘सुर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार पुजा हेगडे

akshay-kumar
बॉक्स ऑफिसवर दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. रोहित शेट्टीने यामध्ये आपल्या आगामी सुर्यवंशी चित्रपटाची एक झलक दाखविली. यात खिलाडी अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात सुर्यवंशी चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. तसेच चित्रपट २७ डिसेंबरच्या आसपास प्रदर्शित केला जाणार असून यात अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. पण या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका केवळ १५ ते २० मिनिटे असणार आहे. पूजाने या चित्रपटात अपोझिट भूमिका साकारावी अशी इच्छा अक्षयने रोहितजवळ व्यक्त केली होती. तसेच अक्षयच्या ‘हाऊसफुल ४’ मध्ये पूजा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment