मेक्सिकोमधील लोक आता करु शकतात सार्वजनिक ठिकाणी प्रणय

mexico
सेक्स ही भारतात अतिशय खासगी गोष्ट असून सार्वजनिक ठिकाणी आपल्या देशात प्रेमी जोडप्यांना किस करणे तर सोडा हॉटेलमध्ये सुद्धा त्रास दिला जातो. कोलकात्यात गतवर्षी तर एका कपलने सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना मिठी देण्यावरून सुद्धा मोठा वाद झाला होता. अशात एक देश असाही जेथील एका एका भागात प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी चक्क सेक्स करण्याची परवानगी दिली आहे. अर्थातच येथील पार्क असो वा बीच कपल्सला खुलेआम सर्वच काही करता येईल. त्यांना यासाठी कुणीही अडवणार नाही.

हा निर्णय मेक्सिकोतील शहर ग्वादलजारा येथे स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. खुलेआम सेक्स करण्याच्या परवानगीसाठी 15 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात नागरिकांसह नगरसेवकांनी सुद्धा मोहिम राबवली होती. आता त्यालाच कायदेशीर परवानगी मिळाली आहे. ग्वादलजारा शहरात यापुढे पार्किंग, पार्क, रिकाम्या आणि पडीक इमारती, रिकाम्या जागा, जंगल अथवा कारमध्ये सुद्धा वाट्टेल तेथे सेक्स करता येईल. यात एक अट अशी की ज्या ठिकाणी कपल सेक्स करत आहेत तेथील नागरिकांनी पोलिसांना तक्रार दाखल करू नये. अन्यथा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागेल.

या मोहिमेला कायद्याचे स्वरुप देण्यासाठी स्थानिक नेते मॉर्फिन ओतेरो यांनी सिंहाचा वाटा दिला. विद्यापीठ आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांची त्यांनी मते जाणून घेतली. यासाठी विविध प्रकारचे सर्वेक्षण केले. बहुतांश लोकांनी त्यामध्ये अशा स्वरुपाच्या कायद्याची मागणी केली होती. जोडपी कुठेही रोमान्स करत असल्यास पोलिस त्यांना त्रास देतात. तसेच त्यांना अटक करून पैसे वसूलतात अशा प्रकारच्या तक्रारी आल्या. हा त्रास कमी करता यावा म्हणून आणि नागरिकांच्या वाढत्या मागणीवरून कायदा बनवण्यात आला आहे.

Leave a Comment