विराट कोहली सचिनपेक्षा कित्येकपटीने सर्वोत्कृष्ट फलंदाज – हार्दिक पांड्याने उधळली मुक्ताफळे

hardik-pandya
टीम इंडियाचे दोन प्रसिद्ध खेळाडू केएल राहुल आणि हार्दिक पांड्या बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणमध्ये यावेळी आले होते. दोघांनी यावेळी मनमोकळेपणाने करणच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दोघांनी शोदरम्यान इतर सहकाऱ्यांबद्दल सिक्रेट सांगितले की त्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनाही फारसे काही माहीत नसेल. हार्दिकने शोदरम्यान विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा कित्येकपटीने सर्वोत्तम फलंदाज असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले.


रॅपिड फायर राउंडमध्ये करणने दोघांना विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यापैकी सर्वोत्तम फलंदाज कोण असा प्रश्न विचारला असता दोघांनी विराट कोहलीचे नाव घेतले. राहुलने ‘मी विराट म्हणेन’ असे उत्तर दिले तर पांड्याने फक्त विराट, असे उत्तर दिले. दोन्ही खेळाडूंवर विराट कोहलीला सचिनपेक्षा सर्वोत्तम फलंदाज म्हटल्यामुळे क्रिकेटचे चाहते कमालीचे रागावले आहेत. पांड्या आणि राहुल दोघेही सोशल मीडियावर तुफान ट्रोल होत आहेत. ट्विटरच्या ट्रेंडमध्येही या दोघांची नावे आली आहेत.

Leave a Comment