अॅपलची नवीन वर्षात रेकॉर्डब्रेक कमाई

apple
सॅन फ्रांसिस्को- मागच्या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यात जगभरात लोकांनी अॅपल अॅप स्टोरमधून 8,482 कोटींची खरेदी केली, पण 1 तारखेला एकदिवसात जास्ती खरेदीचा रेकॉर्ड बनला. ग्राहकांनी या दिवशी 22,387 कोटी रूपयांची खरेदी केली. अॅपलकडून सांगण्यात आले की, ग्राहकांनी ख्रिसमस आणि नववर्षांचे औचित्य साधून 8,482 कोटी रूपयांची खरेदी केली आहे.

याबाबत माहिती देताना अॅपलचे आधिकारी शिलर यांनी सांगितले की, अॅपलची सुट्ट्या असलेल्या दिवसांत आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई झाली आहे आणि ग्राहकांनी नवीन वर्षात एका दिवसांत 22,387 कोटी रूपयांची खरेदी केली आहे. हे आतापर्यंतच्या एका दिवसांतील कमाईत सगळ्यात जास्त आहे.