तरुणाच्या विकृतीला बळी पडली बकरी

rape
केपटाऊन : पुन्हा एकदा माणसामधील विकृतीने कळस गाठल्याचे समोर आले असून एका 21 वर्षीय तरुणाने चक्क बकरीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण अफ्रिकेत ही घटना घडली आहे. दक्षिण अफ्रिकेत घडलेल्या या प्रकारात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बकरीकडून मी यासाठी परवानगी घेतल्याचा अजब दावा त्या विकृत तरुणाने केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. तर या घटनेचा प्राणीमित्रांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

बकरीच्या मालकाने आरोपी केनेडी कंबानीला रंगेहाथ पकडले आहे. बकरीच्या मालकाला सुरुवातीला आपली बकरी कोणी चोरत आहे असे वाटले. पण मालक संशय आल्याने शेजारील लोकांसोबत चोराला पकडण्यासाठी गेला असता, तेथे आरोपी बकरीवर बलात्कार करताना दिसला.

अशी घटना यापूर्वी नोव्हेंबर 2018 रोजी जाम्बिया मध्ये 22 वर्षाच्या रुबेन मवाबाने गरोदर बकरी सोबत बलात्कार केल्याने 15 वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागली होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकामध्ये 33 वर्षाच्या फेसेलानी मकुबेला शेजारच्या घरातील बकरी सोबत बलात्कार करत असल्याने दोषी ठरवण्यात आले होते.

आतापर्यंत भारतातही पशुंसोबत अनेक अत्याचाऱ्याच्या घटना समोर आल्या आहेत. गुजरातच्या वडोदरामध्ये मागील वर्षी जानेवारीमध्ये गायीसोबत अमानवीय कृत्य करत केल्याची घटना समोर आली होती. तर वडोदरापासून 30 किमी अतंरावर पोर गावात काही लोकांनी गायीवर बलात्कार केला होता. जुलै 2018 मध्ये हरियाणाच्या मेवातमध्ये 8 लोकांनी एका बकरीसोबत आक्षेपार्ह कृत्य केले होते. बकरीच्या मालकाने या संबधित तक्रार दाखल केली होती.

Leave a Comment