राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवणार अॅड. उज्ज्वल निकम ?

ujjawal-nikam
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हे उतरण्याची शक्यता असून कारण निकम यांच्या नावावर शुक्रवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भातील वृत्त एका मराठी संकेतस्थळाने दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याबाबत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याच बैठकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत खलबते झाली असल्याची चर्चा आहे. पण निकम यांची सहमती घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. सहा संभाव्य उमेदवार कोण असतील याची पहिली यादी राष्ट्रवादीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत तयार केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाचा गुंता सुटला आहे. राष्ट्रवादीने आपल्याला मिळालेल्या मतदार संघात उमेदवार निश्चित करायला सुरूवात केलीय. रायगड, जळगाव, बीड, परभणी, उस्मानाबाद, कोल्हापूर या जागेबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Leave a Comment