नीरव मोदीच्या उलट्या बोंबा, म्हणतो मी काहीही चुकीचे केलेले नाही

nirav-modi
नवी दिल्ली – भारतात परतण्यास पंजाब नॅशनल बँकेला १३,६०० कोटी रुपयांच्या घोटाळयातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने नकार दिला असून मी काहीही एक चुकीचे केलेले नाही. ‘पीएनबी घोटाळा’ हा घोटाळा नसून प्रमाणाबाहेर गेलेला एक नागरी व्यवहार असल्याचे मोदीने विशेष पीएमएलए न्यायालयाला सांगितले आहे. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येऊ शकत नसल्याचे त्याने म्हटले आहे.

सध्या विशेष पीएमएलए न्यायालयात नीरव मोदीला फरार गुन्हेगार घोषित करावे यासाठी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अर्ज केला असून ही मागणी नवीन फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे. मोदीने हे विधान याला उत्तर देताना केले आहे. यापूर्वी, घोटाळेबाज मोदीने आपण भारतात आलो तर मॉब लिंचिंगचा बळी ठरेन, अशी पळवाट काढली होती. त्याने आताही सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.

याआधीही नीरव मोदीचा हा दावा फेटाळून ईडीने लावला होता. मोदीने उपस्थित केलेली ही भीती पोकळ असून त्यात काही दम नसल्याचे ईडीने सांगितले होते. भारतात परतल्यानंतर आपल्या जीवाला धोका असून त्याबाबत मोदीने पोलिसांत तक्रार दाखल करावी असे बोलून ईडीने त्याला दणका दिला होता.

Leave a Comment