“कृपया टिप देऊ नका, जर बिल मिळाले नाही तर तुमचे जेवण मोफत आहे”

railway
नवी दिल्ली : रेल्वेमधील जेवणाच्या किंमतींचा तक्ते येत्या मार्च महिन्यापासून रेल्वेसह स्टेशनवर सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावले जाणार असून या तक्त्यावर “कृपया टिप देऊ नका, जर बिल मिळाले नाही तर तुमचे जेवण मोफत आहे, अशा आशयाचा एक संदेश लिहिला जाणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेमधील कॅटरिंग सेवा पारदर्शी बनवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

पियुष गोयल आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. गोयल यांनी या बैठकीत काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सुविधांबाबतच्या तक्रारींसाठी एक हेल्पलाईन नंबर सुरु केला जाणार आहे. देशभरातील 723 रेल्वे स्थानकांवर सध्या मोफत वायफायची सेवा दिली जाते. येत्या काळात दोन हजार रेल्वे स्थानकांवर मोफत वायफायची व्यवस्था करण्यात येईल. 31 मार्च 2019 पर्यंत सर्व कॅटरिंग स्टाफ आणि टीटीई यांना स्वाईप मशीन तसेच पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशीन्स वितरीत केल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासन प्रवाशांना ज्या सुविधा देत आहे, त्यांच्या किमंती सार्वजनिक केल्या जाणार आहेत.

Leave a Comment