मोदी बायोपिक पोस्टरने लाँच होण्यापूर्वी केला विक्रम

biopic
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर येत असलेल्या पीएम मोदी या बायोपिकचे पहिले पोस्टर रिलीज होण्यापूर्वीच त्याने विक्रम नोंदविला आहे. या बायोपिकचे पहिले पोस्टर ७ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते. हे पोस्टर एकाचवेळी २३ विविध भाषात लाँच केले जात असून एकवेळी इतक्या भाषात रिलीज होणारे भारतीय सिनेमाचे हे पहिलेच पोस्टर आहे.

२०१८ सालात सिनेसृष्टीत बायोपिकचा बोलबाला होता, नवीन वर्षात हाच ट्रेंड कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या जीवनावरील द अॅक्सिडेंटल प्राईममिनिस्टर हा सिनेमा ११ जानेवारीला रिलीज होत आहे. मोदी यांच्या जीवनावर बनत असलेल्या सिनेमात मोदींच्या भूमिकेत विवेक ओबेराय दिसणार आहे. यात मोदींच्या जीवनातील चढउतार दाखविले जाणार असून ओमंगकुमार या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

Leave a Comment