बुर्ज खलीफाच्या उंचीचे रेकॉर्ड ब्रेक होणार

jehad
जगातील सर्वात उंच इमारत असा लौकिक मिळविलेल्या दुबईतील बुर्ज खलिफाच्या उंचीचे रेकॉर्ड ब्रेक करण्याची स्पर्धा सध्या दोन इमारतीमध्ये सुरु असून हा विक्रम २०२० साली मोडला जाणार आहे. युएइ मध्ये १ किमीपेक्षा अधिक उंचीच्या इमारती बांधल्या जात असून त्या दोन्ही २०२० साली पूर्ण होणार आहेत. अगोदर जी इमारत तयार होईल ती जगातील सर्वाधिक उंच इमारत ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दुबईतील बुर्ज खालीफाची उंची ८३० मीटर आहे. नव्याने दुबई येथेच बांधल्या जात असलेल्या क्रीक हार्बरवरील द टॉवर या इमारतीची उंची ९३८ मीटर असेल आणि हि इमारत बांधण्यासाठी ६५ अब्ज डॉलर्स खर्च होत आहेत. या इमारतीतून ३६० डिग्रीमधून आजूबाजूचा देखावा पाहता येणार आहे. या इमारतीत घरे, हॉटेल्स, बगीचे असणार आहेत.

सौदीमध्ये बांधल्या जात असलेल्या जेहाद टॉवर्स या इमारतीची उंची १ किमी आणि ८ मीटर आहे. ती द टॉवर पेक्षा ७२ मीटर जास्त उंच आहे. तिचे बांधकाम २०१३ मध्येच सुरु झाले असून ती पुढील वर्षात पूर्ण होईल. या इमारतीचे आधीचे नाव किंगडम टॉवर असे होते. बुर्ज खलीफाचे बांधकाम ५ वर्षात पूर्ण केले गेले होते. द टॉवरचे बांधकाम अगोदर पूर्ण झाले तर काही काल ती जगातील सर्वाधिक उंच इमारत बनेल. मात्र किंग्डम टॉवरचे बांधकाम अगोदर झाले तर द टॉवर ला हा मान कधीच मिळणार नाही.

Leave a Comment