ऋषभला शतक ठोकताच आली आईची आठवण

rrishabh
सिडने येथील सामन्यात टीम इंडियाचा युवा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत याने शानदार शतक झळकाविले आणि त्याला आईची तीव्रतेने आठवण आली. दिवसभर फलंदाजी केल्यावर सायंकाळी त्याने आईला भावपूर्ण मेसेज केला जो वाचून कुणाही सहृदय माणसाचे मन भरून येईल.

४ जानेवारी हा ऋषभच्या आईचा जन्मदिवस. त्याच दिवशी त्याने शतक ठोकले. आपल्या संदेशात तो लिहितो, हॅपी बर्थ डे. तू प्रत्येक परिस्थितीत माझ्यासोबत आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आजपर्यंत माझ्या सगळ्या अडचणी तू तुझ्या माथ्यावर घेतल्यास. तुझ्याबद्दल माझ्या भावना बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत.

ऋषभचे कोच देवेंद्र शर्मा यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते कि रुरकी येथे जन्मलेल्या ऋषभसाठी तेथे क्रिकेट कोचिंगची सुविधा नव्हती. तेव्हा तो १२ वर्षाचा असतानाच आई त्याला दिल्लीला घेऊन आली. तेथे कुणी परिचयाचे नव्हते त्यामुळे हे दोघे मोतीबाग गुरुद्वारा मध्ये राहिले. तेथे त्याची आई सेवा करत असे आणि ऋषभ सोनेत क्लब मध्ये क्रिकेटचे धडे गिरवीत असे. रात्री ते दोघे लंगर मध्ये जेवत असत. कालांतराने त्यांना एक छोटी खोली भाड्याने मिळाली. मात्र हे कष्ट फुकट गेले नाहीत.

गतवर्षी ऋषभला आयपीएल मध्ये संधी मिळाली आणि त्यापाठोपाठ टीम इंडिया मध्ये त्याचा समावेश झाला. त्याचे चाहते वेगाने वाढत असून त्याने भारतासाठी आत्तापर्यंत ८ कसोटी, ३ वन डे आणि १० टी २० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत दोन शतके ठोकली आहेत.

Leave a Comment