‘गली बॉय’मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा चेहरा

amruta-subhash
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ चित्रपट येणार असून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे नवे पोस्टर आलिया आणि रणवीरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता. विशेष म्हणजे एक मराठमोळी अभिनेत्री देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

‘गली बॉय’मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अमृता सुभाष ही अभिनेत्री झळकणार आहे. फेसबुकवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करून अमृतानेच याबाबत माहिती दिली आहे. चित्रपटाच्या पोस्टरसोबतच प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर केली गेली आहे. १४ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर, आलियासोबत काम करताना फार मजा आली, असे तिने या फोटोवर कॅप्शन दिले आहे.

मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांची परिस्थिती कशा प्रकारे असते, याची कथा रणवीरच्या ‘गली बॉय’ चित्रपटात मांडली आहे. यात त्यांचा संघर्ष दाखवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. आलिया सध्या ‘ब्रह्मास्त्र’चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तर रणवीर नुकताच ‘सिंबा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता ‘सिम्बा’नंतर ‘गली बॉय’ मधून धमाका करण्यास तो पु्न्हा एकदा सज्ज झाला आहे.

Leave a Comment